गडब येथे कांळबादेवीची यात्रा

। गडब । वार्ताहर ।

पेण तालुक्यातील प्रसिध्द जागृत कांळबादेवीची यात्रा सालाबाद प्रमाणे सोमवारी (दि.22) गडब येथे असून मोठ्या जल्लोषात या ठिकाणी यात्रा संपन्न होणार आहे.
या यात्रेत देवकाठ्याची स्पर्धा हे मोठे आकर्षण असुन उंचच उंच देवकाठ्या उभ्या करण्यासाठी परीसरातील ग्रामस्थ ढोल ताशाच्या गजरात आप आपल्या देवकाठ्या घेउन या यात्रेत येत असतात. जाणती जेष्ठ मंडळींसोबत तरुण सुध्दा या देवकाठ्या स्पर्धेत मोठ्या उत्साहाने भाग घेतात. या देवकाठ्या कळकीचे बांबु, ऐकमेकांवर बांधुन उंच देवकाठी बांधली जाते. या देवकाठ्या मोठ मोठ्या वासाच्या तयार केलेल्या परांचीवर दोराच्या साह्याने उभी केली जाते. देवकाठी उभी करताना ग्रामस्थांच्या एकीचे सामर्थ्य या ठिकाणी दिसते.

या यात्रेत पालणे, खेळण्यांची व मिठाईची दुकाने आसल्याने लहान मुलांना या यात्रेचे विशेष आकर्षण असते. या यात्रेतील विशेष आकर्षण आसलेली देवकाठी स्पर्धा पाहण्यासाठी व कांळबादेवीचे दर्शन घेण्यासाठी नवस फेडण्यासाठी परिसरातील भाविक भक्त तसेच मुंबई, ठाणे, पुणे आदी भागातील भाविक भक्त या यात्रेत येत असतात.

Exit mobile version