मुरुड बाजार समितीत काळबेरे बिनविरोध  

 | तळे | वार्ताहर |

मुरुड बाजार समितीच्या संचालकपदी दर्शन विजय काळबेरे हे बिनविरोध विजयी झाले आहेत. व्यापारी मतदारसंघातून मुरुडचे दर्शन विजय काळबेरे हे उभे होते.

दर्शन काळबेरे हे  नामदेव शिंपी समाज सामाजिक संस्था रायगड, कार्यकारणी सदस्य, मुरुड तालुका राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस, मुरुड नामदेव शिंपी समाज युवक मंडळाचे माजी अध्यक्ष, वसंतराव नाईक कला व वाणिज्य महाविद्यालय मुरुडच्या माजी विद्यार्थी रजिस्टर संघटनेचे उपाध्यक्ष अशा विविध संस्थेवर कार्यरत आहेत. त्यांच्या बिनविरोध विजयाबद्दल नामदेव शिंपी समाज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तम मुळे तसेच संपूर्ण संस्था, मुरुड नामदेव शिंपी समाज, मित्रपरिवार, हितचिंतक, युवक मंडळ, शिक्षण संस्था, राष्ट्रीय काँग्रेस तालुका संघटना या सह अनेक संघटनांनी दर्शन काळबेरे यांचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Exit mobile version