चिवे कबड्डी स्पर्धेत कालभैरव संघ विजयी

| पाली/गोमाशी | वार्ताहर ।
सुधागड तालुका कबड्डी असोसिएशन व रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने स्वयंभू हनुमान क्रीडा मंडळ चिवे यांच्यावतीने तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत तालुक्यातील नामवंत संघांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेतील अंतिम लढत कालभैरव आपटवणे व भैरिनाथ वावे या दोन संघात झाली. मात्र या स्पर्धेत आपटवणे हा संघ विजयी होऊन अंतिम विजयी होण्याचा मान पटकावला. या संघास रोख रक्कम 15 हजार 555 रु व आकर्षक चषक,तर उपविजेता पदाचा मानकरी वावे हा संघ ठरला.

या संघास रोख रक्कम 11 हजार 111 रु व आकर्षक चषक,तृतीय क्रमांक नाथभैरव झाप संघास रोख रक्कम 7 हजार 777 रु व आकर्षक चषक,चतुर्थ क्रमाक जय भवानी उसाळे या संघास रोख रक्कम 7 हजार 777 रु व आकर्षक चषक देऊन मंडळाच्या वतीने गौरविण्यात आले. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू- सुमित मोरे( आपटवणे) उत्कृष्ट चढाई- विशाल मस्के (वावे)उत्कृष्ट पकड- श्रीयोग मोरे, पब्लिक हिरो- संजीव वाघमारे (उसाळे) या खेळाडूंना प्रत्येकी कूलर हे आकर्षक बक्षीस देऊन गौरविण्यात आले.

Exit mobile version