कमल देशमुख यांचे निधन

। खांब-रोहा । वार्ताहर ।
रोहा तालुक्यातील पिंगळसई गावच्या रहिवासी असणार्‍या कमल नारायण देशमुख यांचे गुरुवार दि. 19 मे रोजी राहत्या घरी निधन झाले. देशमुख या अतिशय नम्र व शांत तसेच प्रेमळ स्वभावाच्या होत्या. तर समाजात त्यांनी आपल्या चांगल्या कर्तृत्वाने मोठे नावलौकिक प्राप्त केले होते.त्यांच्या अंत्ययात्रेसमयी राजकीय,सामाजिक व अन्य क्षेत्रातील मान्यवर मंडळी यांनी मोठी गर्दी केली होती. त्यांच्या पश्‍चात मोठा परिवार असून त्यांचे दशक्रिया विधी शनिवार 28 मे रोजी जानकी घाट, जोगेश्‍वरी मंदिर पिंगळसई त येथे तर उत्तरकार्य मंगळवार 31 मे रोजी पिंगळसई निवासस्थानी होणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडूंन देण्यात आली आहे.

Exit mobile version