। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
एनडीटीव्हीचे ज्येष्ठ पत्रकार कमाल खान यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने शुक्रवारी निधन झाले. ते एनडीटीव्हीचे कार्यकारी संपादक होते. त्यांच्या अचानक जाण्याने पत्रकारिता क्षेत्रातून एकच हळहळ व्यक्त होत आहे. ‘जनज्वार’ या संकेत स्थळाने कमाल खान यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. कमाल खान यांच्या बोलण्याची शैली अनोखी होती. अत्यंत साध्या आणि मोजक्या शब्दात ते मोठा आशय मांडायचे. आपल्या अनोख्या अंदाजाने ते आपलं म्हणणं लोकांपर्यंत पोहोचवायचे. कमाल खान यांच्या पत्रकारितेची दखल घेऊन त्यांना रामनाथ गोयंका पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं. तसेच राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना गणेश शंकर विद्यार्थी अॅवार्डही देण्यात आलेला आहे. ते एनडीटीव्हीचे यूपीचे संपादक होते.
कमाल खान यांचे निधन
