कमळ पोळी-भाजी केंद्र सुरू

। अलिबाग । वार्ताहर ।

कमळ सेवा संचलीत पोळी-भाजी केंद्र हा नवीन उपक्रम सोमवारपासून सुरु करण्यात आला आहे. यामध्ये परिसरातील नागरिकांना अत्यंत अल्प किंमतीत पोळी-भाजीचा लाभ घेता येणार आहे. हि पोळी-भाजी कमळ सेवा संथेच्या फिरत्या वाहनातून गरजूंना पुरविण्यात येणार आहे. त्याचे सेवाशुल्क केवळ 20 रु. एवढेच राहणार असून त्याच ठिकाण इतर अल्पोपहारही वाजवी दरात उपलब्ध होणार आहे. यामध्यमातून महिलांना अधिक सक्षम होण्यासाठी व त्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठीचा कमळ सेवा संस्थेचा प्रयत्न आहे.

दरम्यान, या पोळी-भाजी केंद्राचे उद्घाटन अथर्व धारप यांच्या हस्ते करण्यात आले आहे. या उद्घाटना प्रसंगी कमळ सेवा संस्थेचे अध्यक्ष राजेश प्रधान, कमळ पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष गिरीश तुळपुळे, कमळ संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार चाळके, मोरेश्‍वर दातार, लक्ष्मण जुंधारे, सतीशचंद्र पाटील, श्रीनिवास पाटील, कौतुभ कुलकर्णी, गीतांजली ओक, उपमहाव्यवस्थापक रंजन पाटील, इतर अधिकारी तसेच कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

Exit mobile version