राष्ट्रीय स्पर्धेत करण रेवसकरची टीम अव्वल

| चिरनेर | प्रतिनिधी |

पनवेल येथील काळसेकर कॉलेज येथे आयोजित करण्यात आलेल्या टेक्नोस्कॉप राष्ट्रीय स्पर्धेत रसायनी येथील पिल्लेई इंजिनियरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सोलर पॉवरवर चालणारी कार बनविली असून, सोलर पॉवर वेईकल या प्रोजेक्टचा राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत प्रथम क्रमांक आला आहे. करण एकनाथ रेवसकर यांनी सौरऊर्जेच्या तंत्राचा वापर करून, हि कार बनविली आहे. यासाठी त्याला त्याच्या कॉलेजचे मित्र आदेश ठाकूर (उलवे) आणि जेबी थॉमस (रसायनी) या मित्रांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. कन्सेप्ट प्रोजेक्ट तयार करून या टीमने सोलर पॉवरवर चालणारी हि कार बनवली आहे. करण आणि त्यांच्या टीमने बनविलेल्या या प्रोजेक्टचा राष्ट्रीय पातळीवर प्रथम क्रमांक आला आहे. त्यांना बक्षीस म्हणून सन्मानपत्र व वीस हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला आहे. टेक्नोस्कॉप नॅशनल लेवलच्या 2024 च्या स्पर्धेत एकूण 120 विषय होते त्यापैकी 70 विषयांचे सिलेक्शन झाले होते. यात उरण तालुक्यातील चिरनेर येथील करण एकनाथ रेवसकर या विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनाखाली आदेश ठाकूर (उलवे) जेबी थॉमस (रसायनी) या विद्यार्थ्यांनी सोलर पॉवरवर चालणारी कार बनविली आहे. या कारची सहा माणसे वाहून नेण्याची क्षमता आहे. याशिवाय या कारमुळे इंधनाची बचत देखील होणार आहे. यामुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. करण रेवसकर या विद्यार्थ्याला लहानपणापासून विविध प्रकारचे नवनवीन वैज्ञानिक प्रयोग करण्याचा छंद आहे. त्यांनी जोपासलेल्या छंदाचा प्रत्यय या प्रोजेक्टमध्ये राष्ट्रीय स्तरावर दिसून आला. त्यामुळे त्याचे कॉलेजबरोबर चिरनेर गावकर्‍यांनीही अभिनंदन केले आहे.

Exit mobile version