करंजा मच्छिमार संस्थेची 18 डिसेंबरला निवडणूक

| उरण | वार्ताहर |

लांबणीवर पडलेल्या राज्यातील 50 कोटींच्या वरती आर्थिक उलाढाल असलेल्या करंजा मच्छिमार विविध संस्थेची निवडणूक येत्या 18 डिसेंबर रोजी होणार असल्याची माहिती राज्य मत्स्यव्यवसाय विभागाचे निवडणूक निर्णय अधिकारी व उपनिबंधक सहकारी संस्थेचे शिरीष सकपाळ यांनी दिली.

राज्यात आर्थिक उलाढाल असलेल्यांमध्ये करंजा मच्छिमार विविध कार्यकारी सहकारी संस्था एक नंबरला असल्याचे बोलले जात आहे. संस्थेमध्ये एकूण 3812 मतदार आहेत. संचालकपदाची निवड होणार आहे. या संस्थेत 17 संचालकांची गुप्त मतदानाने निवड करण्यात येणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, त्यामध्ये दि. 17 ते दि. 23 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत दाखल करता येतील. छाननी दि. 24 नोव्हेंबरला दुपारी 3.30 वाजता, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत दि. 26 नोव्हेंबर ते दि. 10 डिसेंबरपर्यंत आहे.

मतदान दि. 18 डिसेंबर रोजी होईल. निवडणूक निकाल मतदान झाल्यानंतर लगेच करण्यात येणार आहे. यामुळे मोर्चेबांधणीस सुरुवात झाली आहे.

Exit mobile version