वीर वाजेकर महाविद्यालयात कारगील विजय दिवस

| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
 येथील  वीर वाजेकर महाविद्यालयात  एनसीसी विभागातर्फे  कारगील विजय दिवस साजरा  करण्यात आला. या प्रसंगी कारगील युद्धात वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. प्राचार्य डॉ. पी.जी.पवार, नितीन जैस्वाल या  विद्यार्थ्याने आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे नियोजन व सूत्र संचालन प्रा.संतोष देसाई यांनी केले. कार्यक्रमास उपप्राचार्य, डॉ.विलास महाले, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर  सेवक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Exit mobile version