| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
चाकूचा धाक दाखवून महिलेवर वारंवार बलात्कार केल्याप्रकरणी आरोपी रोशन लहू शेळके (रा. आदई गाव) याच्या विरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात 16 जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. नोव्हेंबर 2025 ते एप्रिल 2026 पर्यंत रोशन शेळके याने पीडित महिलेला मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ दाखवली आणि चाकूचा धाक दाखवून तिच्यावर अनेकदा अत्याचार केला आणि चाकू दाखवून व्हिडिओ काढून घेतला आणि ते व्हिडिओ पीडित महिलेच्या वडिलांना दाखवण्याची धमकी देऊन पुन्हा अत्याचार केला.







