| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
टूर्स अँड ट्रॅव्हल्समधून प्रवास करत असताना अनोळखी व्यक्तीने 2 कोटी 64 लाख 18 हजार रुपये किमतीचे दागिन्यांची बॅग चोरून नेल्याप्रकरणी कामोठे पोलीस ठाण्यात 17 जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. यातील तक्रारदार विक्रमसिंग लाखसिंग हे काळबादेवी, मुंबई येथे राहात असून, ते 15 जून रोजी त्यांचे साथीदार हेमराज सुतार असे दोघेजण डॉल्फिन टूर्स अँड ट्रॅव्हल्स या कंपनीच्या बसमधून प्रवास करत होते. सीट क्रमांक सात आणि आठमधून विजापूर कर्नाटक ते पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवे संपल्यानंतर कळंबोली मॅकडोनाल्डच्या समोर पुणे-मुंबई लेनवर प्रवास करत असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्या ताब्यातील दागिन्यांची असलेली बॅग चोरून नेली. यात सोन्याचे विविध प्रकारचे दागिने, अंगठ्या, पेंडल, लॉकेट, बाळ्या, टॉप्स, मंगळसूत्र यांचा समावेश आहे.







