क्रीडा महोत्सवात कर्जत मुलींचा संघ विजेता

| नेरळ | वार्ताहर |

रायगड जिल्हा शालेय क्रीडा महोत्सवामध्ये रायगड जिल्ह्यात तालुकास्तरावर आणि नंतर जिल्हास्तरावर मैदानी आणि इनडोअर स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. त्यातील जिल्हा शालेय कबड्डी स्पर्धेत कर्जत तालुक्यातील भाऊसाहेब राऊत विद्यालय चींचवली डीकसल येथील मुलींच्या संघाने जिल्ह्यात अव्वल ठरला.

रायगड जिल्हा शालेय क्रीडा स्पर्धेतील कबड्डीची स्पर्धा पाली सुधागड येथे झाल्या. या स्पर्धेत कर्जत तालुक्यातील डिकसळ येथील भाऊसाहेब राऊत विद्यालय चिंचवली या शाळेच्या मुलींच्या 14 वर्षे वयोगटाखालील संघाने रायगड जिल्ह्यातून कबड्डी मध्ये प्रथम क्रमांक मिळवला. जिल्हास्तरीय स्पर्धेत जिल्ह्यातील 15 तालुक्यातील 15 संघामध्ये भाग घेतला होता. या स्पर्धेत कर्जत तालुक्यातील मुलींच्या संघाने अंतिम विजेतेपद मिळवून कर्जत तालुक्याचे नाव पुढे नेले. तर कर्जत तालुक्यातील भाऊसाहेब राऊत शाळेचा संघ आता कोकण विभागीय स्पर्धेत सहभागी होणार आहे.

Exit mobile version