विविध क्रीडा स्पर्धांत विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुका पावसाळी क्रीडा स्पर्धा सध्या सुरु आहेत. त्यात मैदानी स्पर्धेंमध्ये तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद तसेच माध्यमिक शाळांचा सहभाग आहे. बुद्धिबळ स्पर्धेमध्ये तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चंद्रकांत साबळे यांनी, तर खो खो स्पर्धेसाठी गटशिक्षण अधिकारी संतोष दौड यांनी खो खो स्पर्धेसाठी पंच म्हणून काम पाहिले. तालुका पावसाळी क्रीडा महोत्सव सुरु असून, खो खो स्पर्धा तालुक्यातील चिंचवली डिकसळ येथे असलेल्या भाऊसाहेब राऊत विद्यालयात आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे आणि तालुका पावसाळी क्रीडा महोत्सवाचे समन्वयक किशोर पाटील यांच्या उपस्थितीत झाली. खो खो स्पर्धेसाठी कर्जत पंचायत समितीचे गटशिक्षण संतोष दौन्ड यांनी पंच म्हणून काम केले. खो खो स्पर्धेत 14वर्षाखालील मुले गटात भाऊसाहेब राऊत कशेळे प्रथम तर नेरळ येथील व्ही वाय कोठारी शाळेचा संघ दुसऱ्या क्रमांकावर राहिला. 17 वर्षे खालील वयोगटात भाऊसाहेब राऊत विद्यालय चिंचवली डिकसळ प्रथम तर नेरळ विद्या मंदिर संघ दुसऱ्या क्रमांकावर राहिला.19 वर्षाखालील गटात कर्जत येथील अभिनव शाळा प्रथम तर भाऊसाहेब राऊत विद्यालय कशेळे दुसऱ्या क्रमांकावर राहिले. मुलींच्या गटात 14 वर्षाखालील स्पर्धेत अभिनव शाळेचा मुलींचा संघ प्रथम तर भाऊसाहेब राऊत विद्यालय चिंचवली डिकसळ संघ दुसऱ्या क्रमांकावर राहिला.17 वर्षाखालील गटात अभिनव कर्जत प्रथम तर हुतात्मा हिराजी पाटील कडाव संघ दुसरा क्रमांकावर राहिला.19 वर्षाखालील मुलींच्या गटात अभिनव कर्जत प्रथम तर गौळवाडी माध्यमिक विद्यालय दुसरा राहिला.
बुद्धिबळ स्पर्धा कर्जत येथील अभिनव शाळेत झाल्या. त्या ठिकाणी पंच आणि प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी चंद्रकांत साबळे उपस्थित होते. या स्पर्धेत मुलींच्या गटात 14 वर्षाखालील वयोगटात शारदा मंदिराची ज्ञानदा गुजराथी प्रथम तर शबनम हायस्कुलची विद्या मराठी ही दुसऱ्या क्रमांकावर राहिली. 17 वर्षे वयोगटात नेरळ विद्या मंदिर शाळेची भूमिका मोरे हिने प्रथम, तर यांचा शाळेची ऋतुजा भोईर दुसरा क्रमांक पटकावला. 19 वर्षाखालील वयोगट मध्ये अभिनव कनिष्ठ महाविद्यालयाची जान्हवी गंभीर प्रथम आली तर याच महाविद्यालयाची पलक मौर्य दुसऱ्या क्रमांकावर राहिली. मुलांच्या गटात 14 वर्षाखालील गटात गुड शेफर्ड शाळेचा ऋतुराज भोसले प्रथम, तर शारदा मंदिराचा दीप राठोड दुसऱ्या क्रमांकावर राहिला.17 वर्षे खालील वयोगटामध्ये अभिनव शाळचा सोहम काळे प्रथम, तर नेरळ येथील एल.एइ.एस. शाळेचा विपीन कुंदन दुसऱ्या क्रमांकावर राहिला.19 वर्षे वयोगट अभिनव कनिष्ठ महाविद्यालयाचा अश्मित सुर्वे याने प्रथम, तर दर्शन वेताळ याने दुसरा क्रमांक पटकावला.