कर्जत लायन्स क्लब डायमंडचे प्रांतपालांकडून कौतुक

| कर्जत | वार्ताहर |

कर्जत लायन्स क्लब डायमंडला प्रांतपालांनी भेट देऊन क्लबच्या कार्याचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी मार्गदर्शक सूचना देऊन केलेल्या कामाचे कौतुक केले.

लायन्स क्लब कर्जत डायमंडची प्रांतपाल भेट सोहळ्याचे आयोजन ब्राह्मण सभागृहात करण्यात आले होते. सभेची सुरुवात दीपप्रज्वलन व ईशस्तवनाने करण्यात आली. महेश ठोसर यांनी ध्वजवंदन केले. कर्जत क्लबच्या अध्यक्ष मुग्धा ठोसर यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. राजश्री केदार यांनी अहवाल सादर केला. संजीव सूर्यवंशी यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला क्लबचे जिल्ह्याचे पदाधिकारी उपस्थित होते. सुरुवात बोर्ड ऑफ डायरेक्टर सभेने झाली. क्लबच्या सर्व आर्थिक व्यवहाराचा हिशेब आणि गेल्या सहा महिन्यांत झालेल्या विविध उपक्रमांचा आढावा या सभेमध्ये घेण्यात आला. यावेळी प्रांतपाल व अन्य पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शक सूचना केल्या आणि चांगल्या उपक्रमांची प्रशंसा केली.

एन.आर. परमेश्वरन यांच्या हस्ते नवीन सभासद मोहन पाठक व फिरोज सिकलगर यांचा शपथविधी करण्यात आला. त्यानंतर परमेश्वरन यांनी मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे प्रांतपाल अमरचंद शर्मा यांनी क्लबच्या सभासदांशी संवाद साधला. अध्यक्ष मुग्धा ठोसर यांनी अध्यक्षीय भाषण केले. राजश्री केदार यांनी करण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती सांगितली. सूत्रसंचालन वैशाली नेमाडे यांनी केले. याप्रसंगी आशा शर्मा, नयन कावळे, मीना थारवानी, डॉ. शारदा निवाते, अनुप थारवानी, संजय गोडसे, रमाकांत म्हात्रे, डॉ. स्मललद पाटील, संगीता गोडबोले, वैशाली महादाळकर, विजय निवाते, योगेश कापसे, प्रताप गीते आदी उपस्थित होते.

Exit mobile version