| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
‘गोविंदा रे गोपाळा…’ यासह अनेक मराठी, हिंदी गाण्यांच्या ठेक्यावर नाचत रायगड जिल्ह्यामध्ये दहीहंडीचा जल्लोष साजरा होत आहे. अलिबाग येथे शेकाप पुरस्कृत अभिमानाच्या व मानाच्या दहीहंडीच्या सोहळ्याचा ढोल ताशांच्या गजरातून शुभारंभ करण्यात आला. या सोहळ्यात सहभागी होऊन अनेक गोविंदा पथकांनी मानवी मनोरे उभारून सलामी दिली. तो क्षण प्रेक्षकांनी आपल्या मोबाईलमध्ये टिपण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे दहिहंडीचा सोहळा अतिशय रंगतदार ठरल्याचे दिसून आले.

पारंपारिक ढोल ताशांच्या गजरातून दहिहंडी उत्सवाच्या सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला. त्यामुळे महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडले. रायगड जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील यांच्यासह, रायगड बाजारचे चेअरमन नृपाल पाटील, नगराध्यक्षा अक्षया नाईक, महिला आघाडी प्रमुख तथा उपनगराध्यक्षा ॲड.मानसी म्हात्रे, बांधकाम सभापती प्रशांत नाईक आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत नारळ वाढवून या सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शेकापचे ज्येष्ठ नेते द्वारकानाथ नाईक, कामगार आघाडी प्रमुख प्रदिप नाईक, जिल्हा सहचिटणीस ॲड. गौतम पाटील, अलिबाग नगरपरिषदेचे पाणी पुरवठा सभापती अनिल चोपडा, महिला व बालकल्याण सभापती डॉ. साक्षी पाटील, उपसभापती ॲड. अश्वीनी ठोसर, वृषाली ठोसर, ॲड. निलम हजारे, संजना कीर, संतोष गुरव, संध्या पालवणकर, ॲड. निवेदिता वाघमारे, प्रिया वेलणकर, अजय झुंजारराव, अवधुत पाटील, नागेश कुलकर्णी, सतिश प्रधान, सर्व आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते, प्रशांत नाईक मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्य, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आत्तापर्यंत यांनी दिली सलामी
शेकाप पुरस्कृत अलिबाग शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दहीहंडी निमित्त सलामी देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. चेंढरे येथील श्रीदत्त महिला गोविंदा पथकांसह श्रीदत्त पुरुष गोविंदा पथक, श्री कानिफनाथ महिला गोविंदा पथक मेटपाडा, कुरुळ येथील श्री चिद्बादेवी गोविंदा पथकांनी सलामी दिली. तसेच, अलिबाग कोळीवाडा गोविंदा पथकांनी सलामी दिली. अलिबाग कोळीवाडा गोविंदा पथकाने आठ थरांची तसेच पाचनाका महिला गोविंदा पथकाने पाच थरांची मानाची सलामी दिली.







