कर्जत तालुक्यातील ग्रा.पं. सदस्याचे उपोषण सुरूच

। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील नेरळ संकुल विकास प्राधिकरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू असून. ती काढून टाकण्यात यावी यासाठी कर्जत तालक्यातील कोल्हारे ग्रामपंचायत सदस्य विजय रामचंद्र हजारे रायगड जिल्हा परिषदेच्या येथील मुख्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसले आहेत.19 मे रोजी उपोषण सुरू झाले असून चार दिवस झाले तरी निर्णय होत नसल्याने अनधिकृत कामाबद्दल प्रशासन देखील गंभीर नसल्याचे दिसून येत आहे.
उपोषण सुरु केल्यानंतर कोल्हारे ग्रामपंचायत मधील भागासाठी 11 कोटी 67लाख खर्चाची नळपाणी योजना तयार केली असल्याचे पत्र जिल्हा परिषद कडून देण्यात आले.तर कर्जत पंचायत समितीचे अधिकारी यांनी अलिबाग येथे जावून उपोषणकर्ते यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी चार दिवसात उपोषण स्थळी फिरकले नाहीत.विजय हजारे यांच्यासोबत त्यांचे सहकारी उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी अलिबाग येथे चार दिवस उपस्थित आहेत.मात्र विविध मागण्यांसाठी वेळोवेळी उपोषणाचा सनदशीर मार्ग अवलंबून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे. मात्र तरीही कोणतीच कार्यवाही होत नसल्याने पुन्हा एकदा बेमुदत उपोषण मागण्या पूर्ण होईपर्यंत सुरूच राहील असे विजय हजारे यांनी स्पष्ट केले आहे.

Exit mobile version