कर्जतच्या रामदासची चित्रकला जागतिक कला प्रदर्शनात झळकणार

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील बीड सारख्या अतिअशय ग्रामीण भागातील चित्रकार रामदास लोभी यांनी आपली चित्रकला फुलवली. मोठ्या संस्थेत शिक्षण घेऊन आपल्या चित्रकलेला ग्रामीण टच देणारे चित्रकार रामदास लोभी यांच्या चित्रांचे प्रदर्शन सातासुमद्रापार भारावले जात आहे. पर्यटन देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुबई महानगरातील वर्ल्ड गॅलरीमध्ये प्रदर्शन भरणार आहे. बीड बुद्रुकच्या कलाकाराची आंतरराष्ट्रीय कला विश्वात भरारी घेण्याचे कार्य या प्रदर्शनाच्या माध्यमातून होत आहे.

चित्रकार रामदासचा यापूर्वीचा कलाप्रवासही उल्लेखनीय राहिला असून सिंगापूर, दुबई येथे त्यांची एकल चित्रप्रदर्शने आयोजित करण्यात आली होती. याशिवाय दिल्ली, मुंबई, हैदराबाद, बंगळुरू यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये त्यांच्या चित्रप्रदर्शनांचे आयोजन झाले आहे. त्यांची चित्रकृती भारतासह विविध देशांतील कला संग्राहक आणि कलाप्रेमींच्या संग्रहात स्थान मिळवत आहेत.

ग्रामीण जीवन, निसर्ग, मानवी संवेदना आणि सभोवतालच्या पर्यावरणाचे विविध पैलू त्यांच्या चित्रांमधून प्रभावीपणे अभिव्यक्त होतात. आपल्या कलाशैलीतून स्थानिक मातीशी असलेले नाते जपत त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कला विश्वात स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. बीड बुद्रुकसारख्या ग्रामीण भागातून सुरू झालेला त्यांचा हा कलाप्रवास आता जागतिक व्यासपीठापर्यंत पोहोचला आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून विविध देशांतील कलाकारांना आपल्या कलाकृती जागतिक कला क्षेत्रासमोर मांडण्याची संधी मिळणार आहे.

Exit mobile version