शेकापतर्फे धारावीत कार्ल मार्क्सचा भंडारा

कामगार-कष्टकऱ्यांचा भंडारा!

| मुंबई | प्रतिनिधी |

शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने मुंबईतील धारावी येथे कार्ल मार्क्स यांच्या 205 व्या जयंतीनिमित्त भंडारा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास शेकाप सरचिटणीस आ. जयंत पाटील, ज्येष्ठ नेते भालचंद्र मुणगेकर, राजेंद्र कोरडे, साम्या कोरडे आदी मान्यवर उपस्थित होते.

येथील राजीव गांधीनगर येथे झालेल्या या भंडाऱ्यात शाकाहारी, मांसाहारी जेवण देण्यात आले. पक्षाचे सर्व युवा कार्यकर्ते, महिला पदाधिकारी यांनी कार्यक्रमाची धुरा सांभाळली. मोठ्या उत्साहाने स्थानिक नागरिकांनी भंडाऱ्याला उपस्थिती लावली. गरिबाच्या हाताला काम, भुकेलेल्याला अन्न व त्यासाठीची न्यायाची लढाई हा मला समजलेला आणि उमजलेला मार्क्स आहे, असे पक्षाच्या पुरोगामी विद्यार्थी संघटनेच्या नेत्या साम्या कोरडे यांनी सांगितले. जेवणाच्या निमित्ताने मार्क्सबद्दल स्थानिक तरुण पिढी विचारू लागली आहे. काहींनी तर गुगल सर्च करून माहिती मिळवण्यास सुरुवात केली, असे राजेंद्र कोरडे यांनी सांगितले.

Exit mobile version