कर्मयोग लघुपटाचा प्रिमियर शो

। वाघ्रण । वार्ताहर ।

अलिबाग तालुक्यातील सारळ येथील कथा लेखक साहित्यिक श्रीकांत कवळे यांच्या कथेवर आधारीत कर्मयोग या लघुपटाचा प्रिमियर शो शनिवारी (दि.22) कुरुळ येथील सुरुची गार्डन रिसॉर्टमध्ये संपन्न झाला. या लघुपटाचे दिग्दर्शन प्रदीप मेस्त्री यांनी केले असून निर्माते म्हणून डॉ. आशिश शेटे, श्रीकांत कवळे, अरुणा कवळे यांनी प्रथमच मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले आहे. मराठी रंगभूमी चित्रपट सृष्टी आणि मालीकांमधून अभिनय करणार्‍या यशस्वी कलाकारांनी यामध्ये आदाकारी केली आहे. या शोसाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी कैलास पिंगळे, अर्जुन गावंड, अल्हाद पाटील, राजाभाऊ ठाकूर, गजूशेठ दळी, रुपेश पाटील, दीपक पाटील आदिंनी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच, हा लघुपट दर रविवारी ब्रम्हा विष्णू महेश चित्रपट गृहात प्रदर्शीत केला जाईल, असे प्रतिपादन गजुशेठ दळी यांनी जाहीर केले.

Exit mobile version