कर्मवीर भाऊराव पाटील जयंती

। पोलादपूर । प्रतिनिधी ।

रयत शिक्षण संस्था सातारा संचलित विद्यामंदिर पोलादपूर येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 137 व्या जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. पोलादपूर शहरातील शंकरराव महाडीक इंग्रजी माध्यम शाळेच्या तसेच रयत विद्यामंदिरच्या स्थानिक कमिटी सदस्या समाजसेविका प्रिती बुटाला व समीर साळुंखे यांच्याहस्ते रांगोळी प्रदर्शन दालनाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामचंद्र शेठ होते.

रयत विद्यामंदिराचे प्राचार्य आर.एस. साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात एस.एन. ढगे, एस.के. शिंगटे, एम.एस. म्हात्रे आदी निमंत्रकांच्या उपस्थितीत कॅप्टन दत्ताराम मोरे, अ‍ॅड. सचिन गायकवाड, शंकर दरेकर, बापू जाधव, वैभव सावंत, कांचन बुटाला, चारूलता बडगे, अथर्व बुटाला तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. जयंती सोहळ्यापूर्वी रयत विद्यामंदिर पोलादपूरच्या विद्यार्थ्यांनी पोलादपूर शहरामध्ये सवाद्य मिरवणूक व शोभायात्रा काढली होती.

Exit mobile version