काशिनाथ पाटील यांचा वाढदिवस उत्साहात

| पनवेल | प्रतिनिधी |

पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती, पनवेल विधानसभेचे अध्यक्ष काशिनाथ पाटील यांचा वाढदिवस दि. 20 जानेवारी रोजी त्यांच्या वलप या निवास्थानी मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. याप्रसंगी सुधाकर लाड यांच्या ‘आपला माणूस’ या अंकाचे प्रकाशन माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक गोपाळ भगत, प्रकाश म्हात्रे, वावंजे ग्रामपंचायतीचे सरपंच डी.बी. मात्रे, सरपंच मदन मते, वलप ग्रामपंचायतीचे सरपंच भोलानाथ पाटील, पाले बुद्रुक सरपंच कांचन वास्कर, कोलवाडीचे सरपंच राजा भोईर, नेवालीचे सरपंच भगवान पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. याप्रसंगी पनवेल तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

याप्रसंगी कानपोली गावातील राजेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या सहकार्‍यांनी बाळाराम पाटील यांच्या उपस्थितीत शेतकरी कामगार पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला.

Exit mobile version