मुले घडविताना जिजाऊंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा – रंजना धुळे

| कर्जत | प्रतिनिधी |

‌‘माँसाहेब जिजाऊंनी शिवाजी महाराज यांच्यावर केलेले संस्कार, त्यांचे संगोपन, त्यांना दिलेली शिकवणूक यामुळेच त्यांना भारतभूमीवर जाणता राजा म्हणून संबोधले जाते. मुले घडविताना जिजाऊंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा, असे प्रतिपादन महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका अध्यक्षा ॲड. रंजना धुळे यांनी केले.

महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनसंपर्क कार्यालयाच्या सभागृहात जिजामाता जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सुमन देशमुख यांच्या हस्ते जिजामातांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. कांता सांगळे यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून जिजाऊंना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी ॲड. रंजना धुळे, उपाध्यक्षा मनीषा पाटील, सरचिटणीस विमल देशमुख, राणी सावंत, अंकिता मोरे, सरपंच दीपाली पिंगळे, सरपंच जयवंती कोळंबे, सरपंच प्रभावती लोभी, माजी सरपंच प्रतिभा लोहकरे, माजी सरपंच निरा विचारे आदी उपस्थित होते.

याप्रसंगी विमल देशमुख,कल्पना देशमुख, प्रभावती लोभी, प्रतिभा लोहकरे, लक्ष्मी शिंगटे, मनीषा देशमुख, दीपा कदम, अंकिता मोरे, उर्मिला विचारे, रेखा मोरे आदींनी मनोगत व्यक्त करताना आम्हाला प्रथमच व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याने आमचा आत्मविश्वास वाढला असल्याचे सांगितले. यावेळी जागृती पालकर, लक्ष्मी शिंगटे, स्नेहा पालकर, दीपा कदम, नयना आखाडे, वंदना शिंदे, वावलोली ग्रामपंचायत सदस्या रुपाली कांबेरे, सारिका लांघी, उर्मिला विचारे, मनीषा देशमुख, गायत्री भालेराव, रेखा बदे, वंदना विसावे, आरती दीक्षित, जयश्री गायकर आदी महिला उपस्थित होत्या.

Exit mobile version