स्मार्ट मोबाईलपेक्षा ध्येय स्मार्ट ठेवा: सिमरत गायकवाड

। खोपोली । प्रतिनिधी ।

आजच्या काळात स्मार्ट टिव्ही, मोबाइल वापरले जातात. परंतु, आपले ध्येय स्मार्ट ठेवल्यास चांगला खेळाडू घडू शकतो. त्यामुळे चांगला विरंगुळा जोपासा, यश नक्कीच मिळेल, असे मत जिजामाता राज्य क्रिडा पुरस्कार विजेत्या अंतराष्ट्रीय कबड्डी मार्गदर्शन सिमरत गायकवाड यांनी व्यक्त केले आहे. खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्व शाळा महाविद्यालयांचे एकत्रित वार्षिक क्रीडा महोत्सव 2024 -25 चा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. हा उद्घाटन सोहळा सिमरत गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या.

जनता विद्यालयाच्या कै. पंत पाटणकर क्रीडा मैदानावर जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, जनता विद्यालय प्राथमिक शाळा, जनता विद्यालय पूर्व प्राथमिक शाळा, बी.एल. पाटील तंत्रनिकेतन, के.एम.सी. कॉलेज, शिशुमंदीर, गगनगिरी इंटरनँशनल स्कूल आणि विधी महाविद्यालयाचा सर्व एकत्रित वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन संपन्न झाले. क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन संस्थेचे उपाध्यक्ष अबूबकर जळगांवकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.

यावेळी कार्यवाह किशोर पाटील, संचालक दत्ताजीराव मसुरकर, जनता विद्यालय अध्यक्ष कैलास गायकवाड, पूर्व प्राथमिक शाळा अध्यक्ष अनंता हाडप, बी.एल.पाटील तंत्रनिकेतन अध्यक्ष जितेश ठक्कर, प्राचार्य प्रशांत माने, छत्रपती विद्यालय अध्यक्ष भास्कर लांडगे, शिशु मंदिर अध्यक्ष विजय चुरी, मुख्याध्यापिका जान्सी आँगस्टीन, समिक्षा ढोके, विधी महाविद्यालय अध्यक्ष नरेंद्र शहा, प्राचार्या वर्षा घारे, माजी नगरसेविका केविना गायकवाड, सेवानिवृत्त क्रीडा शिक्षक पद्माकर गायकवाड यांच्यासह शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version