पनवेलमध्ये केरोसीनचे होणार वाटप

| नवीन पनवेल | प्रतिनिधी |

एलपीजी गॅसच्या तुटवड्यामुळे नागरिकांना मध्यंतरीच्या काळात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. या अडचणींवर राज्य सरकारने तोडगा काढला होता. रेशन दुकानांमध्ये केरोसीनचे वाटप करण्यात येणार होते. त्यानुसार पनवेलमध्ये केवळ 18 हजार लिटर केरोसीनचे वाटप करण्यात येणार आहे. मात्र, हे वाटप कधी आणि कोणाला होणार याचे उत्तर अधांतरी आहे. रेशन दुकानांमध्ये केरोसीनचे वाटप करण्यात येणार अशी घोषणा करण्यात आली. मात्र, हे केरोसीन नेमके कोणाला मिळणार? लाभार्थ्यांचे निकष नेमके काय हे अद्याप समजलेले नाही. शिधापत्रिका धारकाला तीन लिटर केरोसीन देणार असल्याचे म्हटले आहे. त्यानुसार पनवेल तालुक्यात दीड टँकर केरोसीन येणार आहे. पनवेल तालुक्यात डिसेंबर 2024 पासून शून्य लिटर रॉकेलचा पुरवठा होतो. मात्र, दीड टँकर रॉकेलचा पुरवठा कोणत्या दुकानदाराला होईल? त्यांचे परवाने नूतनीकरण झाले आहेत का? रॉकेल घेण्यासाठी जागा आहे की नाही याची पाहणी कोण आणि कशी करणार असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

Exit mobile version