पंतप्रधानांच्या इंग्रजी पत्राला केविनचे हिंदी उत्तर

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त 73 व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरातील विविध खेळाडूंना पत्र पाठवून शुभेच्छा दिल्या आहेत. या पत्राला इंग्लंडचा माजी खेळाडू केविन पीटरसन याने उत्तर दिले असून, विशेष म्हणजे हे उत्तर त्यांने हिंदी भाषेत दिले आहे. यंदा भारत आपल्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहे. 73 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त भारताला यंदाच्या वर्षी स्वातंत्र्य मिळून 75 वर्षही पूर्ण झाले आहे. यानिमित्त केंद्र शासनाकडून आजादी का अमृतमहोत्सवया हॅशटॅगखाली विविध उपक्रमदेखील राबविण्यात येत आहेत. दरम्यान, प्रजासत्ताक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताशी चांगले संबंधित व भारतीयांशी आपुलकी असलेल्या जगभरातील अनेक खेळाडू तसेच इतर मान्यवरांना पत्र पाठवून शुभेच्छा दिल्या आहेत. नुकतेच पंतप्रधान मोदी यांनी पाठविलेल्या पत्राला दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू जॉन्टी रोड्सनेही उत्तर देत भारतीयांची मने जिंकली होती. याशिवाय वेस्ट इंडिजचा आक्रमक फलंदाज ख्रिस गेल यानेदेखील आपल्याला मिळालेल्या पत्राबाबत सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच सर्व भारतीय जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.


इंग्रजी पत्राला हिंदीतून उत्तर
पीटरसनने हिंदीत लिहिलेल्या पत्रात म्हटलेय की, नरेंद्र मोदीजी आपल्या पत्रासाठी धन्यवाद. 2003 मध्ये मी भारतात पाऊल ठेवल्यापासून प्रत्येक भेटीत भारताबद्दलचे माझे प्रेम वाढले आहे. एक अभिमानी देश आणि जागतिक दर्जाचे पॉवरहाऊसफ असलेला भारत आपल्या वन्यजिवांचे संरक्षण करण्यात जगाचे नेतृत्व करत आहे. याबद्दल धन्यवाद देण्यासाठी मी तुम्हाला लवकरच प्रत्यक्ष भेटण्यास उत्सुक आहे!

Exit mobile version