जे.एम .म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचा पुढाकार
| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल-उरणमध्ये खादी, ग्रामोद्योगचे अभ्यासक्रम सुरु करण्यात आलेले आहे. यासाठी जे.एम .म्हात्रे चॅरिटेबल संस्थेने पुढाकार घेतला आहे. या विविध अभ्यासक्रमांची माहिती देण्यासाठी संबंधित विभागातील अधिकारी वर्गाला मार्गदर्शन करण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते. या शिबिरात युवक, महिला आणि तृतीयपंथी अशा प्रत्येक स्तरातील नागरिकांनी सहभाग नोंदवला.
संस्थेचे अध्यक्ष प्रीतम जनार्दन म्हात्रे यांनी पनवेल ,खांदा कॉलनी, उरण , वेश्वी आणि खालापूर या ठिकाणी पनवेल आणि उरण मधील नागरिकांसाठी सुरू केले आहेत. सध्याच्या काळात नागरिकांमध्ये स्कीन आणि हेअर ट्रीटमेंट संदर्भात जागृतता झाली आहे.सध्या या क्षेत्रात बरीच रोजगाराची संधी आहे. त्यासाठी त्याला अनुसरून जे विविध प्रकारचे कोर्सेस आहेत ते सवलतीच्या दरात म्हात्रे चॅरिटेबल संस्था आणि तंत्राज हेल्थ अँड ब्युटी वेलनेस क्लिनिक च्या डॉ.पल्लवी संदीप शिंदे मार्गदर्शनखाली सुरू करण्यात आले आहे. जेणेकरून हे कोर्सेस केल्यावर आपल्या परिसरातच रोजगार आणि स्वयंरोजगाराची संधी तरुणांना उपलब्ध होईल असे त्यांनी सांगितले.
स्कीन आणि हेअर ट्रीटमेंट संदर्भातील इतर कोर्सेस हे 60 ते 80 % सवलतीच्या दरात जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या सहकार्यामुळे करता येणार आहेत. या संदर्भात अधिक माहितीसाठी ( 098190 98685 ) या क्रमांकावर संपर्क साधावा असे डॉ.पल्लवी संदीप शिंदे यांनी सांगितले. स्वयंरोजगाराच्या दृष्टीने या विविध कोर्सेस संदर्भात माहिती घेऊन आपल्या आवडीनुसार कोर्सेस करावे. ज्यामध्ये शासनाचे जे अधिकृत शुल्क आहे. त्यामध्येच नागरिकांना कोर्सेस उपलब्ध होणार आहेत असे मंजुषा परब यांनी सांगितले. खादी आणि ग्रामोद्योग आयोग अंतर्गत कोर्सेस संदर्भात अधिक माहितीसाठी 9773590982 / 9757472380 यावर संपर्क साधावा.
भविष्यात रायगड, नवी मुंबइमध्ये जे नवीन उद्योगधंदे येणार आहेत त्यामध्ये निर्माण होणार्या नोकरीच्या ज्या संधी आहेत. त्यावेळी सदर शासनमान्य केलेले कोर्सेसचे प्रमाणपत्र तरुणांना उपयोगात येणार आहे. तसेच नवीन उद्योग सुरू करण्यासाठी सुद्धा सदर घेतलेले प्रशिक्षण त्यांच्या भविष्यातील उद्योग वाढीसाठी युवकांना नक्कीच फायदेशीर ठरेल.
– प्रीतम म्हात्रे,अध्यक्ष