। मुंबई । प्रतिनिधी ।
पुणे भोसरी एमआयडीसी जमीन गैरव्यवहारप्रकरणी माजी मंत्री एकनाथ खडसे यांना दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने खडसेंना आठवडाभरा अटक करु नका, असे आदेश दिले आहेत. या आठवडाभरात पीएमएलए कोर्टात खडसे रितसर जामिनासाठी अर्ज करू शकतात. मागच्या आठवड्यात या प्रकरणात एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसेंना मुंबई हायकोर्टाने दिलासा दिला होता.
यापूर्वी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टाने एकनाथ खडसेंच्या पत्नी आणि या प्रकरणातील आरोपी मंदाकिनी खडसे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला होता. मंदाकिनी खडसेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते. पण, या प्रकरणात एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसेंना मुंबई हायकोर्टाने दिलासा दिला.