| अलिबाग | प्रतिनिधी |
खालापूर तालुक्यातील चौक येथे इरसाल गडाच्या पायथ्याजवळ असलेल्या ठाकूर समाजाच्या वसाहतीवर दरड कोसळली. यामध्ये 48 पैकी 10 ते 15 घरे वगळता अन्य जवळपास 33 घरे ढिगाऱ्याखाली गेली.
पबजी खेळणारी मुले जागी होती. त्यांनी आपला जीव वाचवला व सदर घटना कळवल्याचे सांगण्यात आले. कर्जत-खालापूरचे सर्व अधिकारी, पोलीस यंत्रणा, एनडीआरएफ टीम, अपघातग्रस्त टीमचे सदस्य, घटनास्थळी पोहचले.
मदतीचा ओघ चालू झाला आहे. आपल्याकडील 10 टेन्ट घेऊन प्रथमेश जाधव, प्रदिप गोगटे घटनास्थळी पोहचले. तर, रोटरी क्लबच्या माध्यमातून चादरी, ब्लँकेट, पाणी, बिस्कीट पुडे घेऊन सुनिल सोनी आणि सदस्य कर्जतमधून रवाना झाले.