। चिरनेर । वार्ताहर ।
शेतकर्यांसाठी खरीप हंगाम पीक स्पर्धा राज्य, जिल्हा व तालुका स्तरावर स्वतंत्रपणे आयोजित न करता एकाच वर्षात तालुकास्तरावर आयोजित करण्यात येणार आहेत. त्यामुळे आत्ता शेतकर्यांना तालुका पातळीबरोबर जिल्हा व राज्य पातळीवर सहभाग घेता येणार आहे. सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी शेतकर्यांनी तालुकास्तरावरील पीक स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन, या शेतकर्यांची आलेली उत्पादकता आधारभूत धरून, राज्य, जिल्हा व तालुका स्तरावरील स्पर्धेसाठी विजेत्या शेतकर्यांची निवड करण्यात येणार आहे. त्यामुळे या स्पर्धेत जास्तीत जास्त शेतकर्यांनी सहभाग घेण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी अर्चना सुळ- नारनवर यांनी केले आहे.
अर्ज भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
प्रवेश शुल्क भरण्याचे चलन, सातबारा व आठ अ चा उतारा जात प्रमाणपत्र (फक्त आदिवासी बांधव) बँक खाते पासबुकाच्या पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत, अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट 2024
पीक स्पर्धा बक्षिसांचे स्वरूप
तालुका पातळीवर अनुक्रमे पाच हजार रुपये, तीन हजार रुपये, दोन हजार रुपये जिल्हा पातळीवर अनुक्रमे दहा हजार रुपये, सात हजार रुपये, पाच हजार रुपये राज्य पातळीवर अनुक्रमे 50 हजार, 40 हजार रुपये, 30 हजार रुपये, असे बक्षिसांचे स्वरूप आहे.