। खेड । वार्ताहर ।
दैनिक कृषीवलचे खेड तालुका प्रतिनिधी आणि खेड तालुका पत्रकार संघाचे जेष्ठ सदस्य अजित सिताराम जाधव (वय ५४) यांचे रविवार दिनांक १० रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास आकस्मिक निधन झाले. जाधव यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
खेडमध्ये पत्रकारिता क्षेत्रात दीर्घकाळ काम केलेले अजित जाधव हे सध्या दैनिक कृषीवल या दैनिकाचे खेडचे तालुका प्रतिनिधी म्हणून काम करत होते. पत्रकार संघटनांचे ते सदस्य होते. खेड तालुका खरेदी- विक्री संघाचेते संचालक होते. गेल्या अनेक वर्षापासून संघाचे संचालक म्हणून ते कामकाज पाहत होते. त्यांच्या आकस्मिक निधनाने सर्वच क्षेत्रातील व्यक्तींनी शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी , एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. सोमवार दि ११ रोजी सकाळी ९ वाजता त्यांच्या पार्थिवावर चाकाळे बौद्धवाडी येथील त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.