खेमसिंग चव्हाण यांचे निधन

। सुतारवाडी । वार्ताहर ।
रायगड जिल्हा प्राथमिक आदर्श शाळा येरळचे मुख्याध्यापक खेमसिंग चव्हाण यांचे वयाच्या 51 व्या वर्षी आकस्मिक निधन झाले.चव्हाण यांचे शिक्षण बी.ए. बी.एड. होते. ते 20 जून 1995 ला सेवेत रुजू झाले. गौळवाडी, पहुर या प्राथमिक शाळेत यशस्वी सेवा केल्यानंतर सन 2010 पासून येरळ ( ता. रोहा ) या प्राथमिक शाळेत त्यांचा सेवाकाळ सुरु झाला. त्यांनी गौळवाडी पहुर या शाळेप्रमाणे येरळ प्राथमिक शाळा बोलकी केली. एवढेच नाही तर या शाळेला पहिला आय.एस.ओ. मानांकन मिळवून देण्याचा त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी, एक मुलगा, मुलगी भाऊ असा परिवार आहे. खेमसिंग चव्हाण यांच्या अचानक निधनाने अनेकजण शोककुल झाले आहेत.

Exit mobile version