75 लाख खर्च केले…पण उपयोग शून्य

। उरण । वार्ताहर ।
खोपटा पूल ते कोप्रोली रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने पडलेल्या खड्ड्यांमुळे या रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अशातच साईडपट्ट्यांचे कामही योग्य प्रकारे झाले नसल्याने बुधवारी (ता. 3) मालवाहू कंटेनर रस्त्याच्या कडेला उलटल्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. खोपटा-कोप्रोली-चिरनेर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी 2021-22 मध्ये सुमारे 3 कोटी 75 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला होता. या निधीतून या रस्त्याचे डांबरीकरण तसेच रुंदीकरण करण्यात आले आहे. मात्र, ठेकेदाराने केलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे रस्त्यावर विविध ठिकाणी खड्डे पडले आहेत. अशातच बुधवार सकाळी रस्त्याच्या साईडपट्टीवरून मालवाहू कंटेनर पलटी झाल्याने झालेल्या वाहतूक कोंडीत विद्यार्थी आणि कामगारवर्गावर जवळपास तासांहून अधिक काळ अडकण्याची वेळ आली.

Exit mobile version