| नेरळ | प्रतिनिधी |
बॉबी देओलचे बिग बजेट चित्रपटात कर्जतमधील भिसेगावातील बालकलाकार खुशी हजारे महत्वाच्या भूमिकेत दिसून येत आहे. ‘वेड’ या चित्रपटाच्या माध्यमातून आघाडीची बालकलाकार म्हणून समोर आलेली खुशी आता ‘वॉर 2’ मुळे पुन्हा चर्चेत आली आहे.
देशभरातील चित्रपटगृहात ‘वॉर 2’ हा बिग बजेट चित्रपट नवनवीन विक्रम करीत आहे. या चित्रपटात बॉबी देओलसोबत बालकलाकार खुशी हिच्या अभिनयाचे कौतुक होत आहे. ‘वेड’ या मराठी आणि हिंदीमध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटात बालकलाकार म्हणून पुढे आलेली खुशी हजारे हिने आपल्या अभिनयाने सर्वांना मंत्रमुग्ध केले होते. त्यावेळी अभिनेता रितेश देशमुख याच्या तोडीचा अभिनय खुशीने केला होता आणि त्याबरोबर तिला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. त्यात आता तिचा ‘वॉर 2’ मधील अभिनय चित्रपट रसिकांची वाहवा मिळवत आहे. हा चित्रपट संपल्यावर ही पोस्ट क्रेडिट सीन दाखवले जातात. त्यातील एका सीनमध्ये खुशी हिच्या हातावर बॉबी देओल टॅटू काढत असल्याचे पाहून तिचा अभिनय किती उजवा झाला याची चर्चा होत आहे.






