खुशी हजारे ठरली उत्कृष्ट बालकलाकार

| नेरळ | वार्ताहर |

वेड या प्रसिद्ध मराठी चित्रपटातील बाल कलाकार कर्जत शहरातील भिसेगाव येथील खुशी सचिन हजारे हिला चित्रपट सृष्टीतील मानाचा झी पुरस्कार मिळाला आहे. वेड चित्रपटात रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांच्यासोबत खुशीची मुख्य भूमिका होती. दरम्यान, झी सारख्या सर्व क्षेत्रात आघाडीवर असलेल्या वाहिनीचा मानाचा पुरस्कार मिळविणारी खुशी ही रायगड जिल्ह्यातील पहिलीच कलाकार आहे.

कर्जत येथे राहणारी बाल कलाकार खुशी ही यापूर्वी रंगमंचावर दिसत होती. लहान भूमिका तर कधी जाहिराती मध्ये दिसणारी खुशी हिला रितेश देशमुख याने आपल्या बिग बजेट वेड या चित्रपटात मुख्य भूमिका पैकी एक असलेली बाल कलाकाराची भूमिका दिली होती. वेड या चित्रपटाने कोटींचा गल्ला बॉक्स ऑफिसवर केला होता. त्यात आता झी गौरव सोहळ्यात सर्वोत्कृष्ट बाल कलाकार म्हणून खुशी हजारे ल नामांकन मिळाले होते. मात्र तिच्या नावाची घोषणा झाल्याने कर्जत तालुक्याचे आणि रायगड जिल्ह्याचे नाव उंचावले आहे. झी गौरव सोहळ्यात असा पुरस्कार मिळविणारी खुशी पहिलीच कलाकार ठरली आहे. वेड चित्रपटात भूमिका महत्वाची साकारणार्‍या बालकलाकाराचे खुशीने या चित्रपटात खूप छान काम केले आहे. त्यामुळे तिच्या जबरदस्त अभिनयाचं देखील कौतुक झाले होते. वेड चित्रपटामुळे चिमुरडी खुशी हजारे पुन्हा अशोक मामांसोबत काम करताना दिसली. प्रवास चित्रपटामुळे झालेली मैत्री या चित्रपटातून अधिकच घट्ट बनली. तर सेटवर जेनेलिया सोबत देखील तिचे सूर चांगलेच जुळून आले होते. रितेश आणि जेनेलियाच्या अभिनयाला तोडीसतोड खुशीने देखील चित्रपटातील तिने तिचा अभिनव अगदी चोख बजावले आहे. त्यामुळे खुशीचे देखील सर्वत्र कौतुक केले जात होते.

खुशी हजारे हीने यापूर्वी हिंदी मराठी चित्रपटातून चाईल्ड आर्टिस्ट म्हणून काम केलेले आहे. वजनदार, प्रवास, सरबजीत, भूत, आपडी थापडी अशा चित्रपटातून तिला विकी कौशल, ऐश्‍वर्या राय, श्रेयस तळपदे, अशोक सराफ, पद्मिनी कोल्हापूरे, सई ताम्हणकर या मोठमोठ्या सेलिब्रिटींसोबत अभिनय करण्याची संधी मिळाली होती.

Exit mobile version