| पुणे | प्रतिनिधी |
पुण्यातील वाघोली रोडवर चालता चालता धक्का लागल्याने झालेल्या वादातून थेट तरुणाचे अपहरण केल्यानंतर जबरदस्तीने गुगल-पे वरुन पैसे उकळले. लुकमान हासमत हश्मी यांनी याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात माहिती दिली आहे. कुमार पवार, नितीन पवार, ओम गव्हाणे, मनोज निंबाळकर आणि विकास कांबळे यांना पोलिसांनी अटक केली आहे.
वाघोली रोडवर तक्रारदाराचा भाऊ भाजी खरेदी करण्यासाठी पायी गेले होता. त्यावेळी एका 17 वर्षाच्या मुलाने फिर्यादीच्या खांद्याला धक्का दिला, म्हणून तरुणाने त्यास “पाहून चालत जा” असे म्हणाले. या गोष्टीचा त्याला राग आला आणि त्याच्या साथीदाराने त्यांना मारहाण करायला सुरुवात केली. मारहणीवरच न थांबता त्या तरुणाने त्याच्या इतर साथीदारांना बोलवून घेतले. पिडीतांना गाडीमध्ये बसवून जबरदस्तीने एका अज्ञात स्थळी नेऊन गुगल पेवरुन 18 हजार रुपये घेतले. या सगळ्या प्रकरणानंतर पिडीत यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने सापळा रचून या तरुणांना आज ताब्यात घेऊन अटक केली.
तरुणाचे अपहरण करत जबरदस्तीने उकळले पैसे
