खंडणीसाठी 11 वर्षीय मुलाचे अपहरण

। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल भागात राहणार्‍या एका कामगाराने त्याच्याबरोबर काम करणार्‍या कामगारांच्या 11 वर्षीय मुलाचे अपहरण करून त्याच्याकडे 30 हजार रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तनवीर असे या आरोपीचे नाव असून पनवेल शहर पोलिसांनी त्याच्याविरोधात खंडणीसह अपहरणाचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरु केला आहे.

या घटनेतील तक्रारदार पनवेल भागात पत्नी व तीन मुलांसह राहतो. तक्रारदार कामगार आपल्या कामावर गेला असताना त्याच्याबरोबर काम करणारा कामगार आरोपी तनवीर याने तक्रादाराच्या 11 वर्षीय मुलाला खाण्यास देण्याच्या बहाण्याने सोबत घेतले. त्यानंतर त्याचे अपहरण केले. त्यानंतर कामगाराने त्याने मुलाची शोधाशोध सुरु केल्यानंतर त्याच्या मुलाला तनवीर याने सोबत नेल्याची माहिती त्याला मिळाली.त्यामुळे त्याने आरोपी तनवीर याच्या मोबाईलवर संपर्क साधून त्याच्या मुलाला घरी घेऊन येण्यास सांगितले, मात्र आरोपी तनवीर याने तक्रारदाराकडे 30 हजार रुपयांची मागणी केली, अन्यथा त्याच्या मुलाला मारण्याची धमकी दिली अखेर या पीडित कामगाराने पनवेल शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी तनवीर याचा शोध सुरु केला आहे.

Exit mobile version