अल्पवयीन मुलाचे अपहरण

| पनवेल | वार्ताहर |
एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण झाल्याची घटना पनवेलजवळील उसर्ली गाव येथे घडली आहे. राहुलकुमार सुधीर मंडल असे त्याचे नाव असून, त्याची उंची अंदाजे 4 फूट, अंगाने सडपातळ, रंग काळा, चेहरा गोल, नाक छोटे पसरट, डोळे काळे, केस लहान, दोन्ही पाय वाकडे असून, अंगात लाल रंगाचा हाफ टी-शर्ट व निळ्या रंगाची हाफ पँट घातली आहे. त्याला हिंदी भाषा अवगत आहे. या मुलाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाण्याशी 022-27452333 किंवा सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष शेटे यांच्याशी संपर्क साधावा.

Exit mobile version