अल्पवयीन मुलाचे अपहरण

खांदेश्‍वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

| पनवेल | वार्ताहर |

आई आणि वडिलांसोबत शाळेत गेलेला (14 वर्षीय) तरुण पुन्हा घरी परतलाच नसल्याची धक्कादायक घटना खांदा कॉलनीत घडल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पालकांच्या तक्रारीनुसार खांदेश्‍वर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात अपहरणचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निर्विघ्न (14) असे अपहरण झालेल्या तरुणाचे नाव आहे. निर्विघ्न याची शाळेची फी भरली नसल्याने निर्विघ्न आणि त्याची आई तसेच वडील हे तिघे शाळेतील शिक्षकांना भेटण्यासाठी गेले. शिक्षकांची भेट घेऊन निर्विघ्नची फी काही दिवसांतच भरतो, अशी विनंती निर्विघ्न यांच्या वडिलांनी केली. शिक्षकांनी ही विनंती मान्य करून निर्विघ्नच्या नाम वर्तनाबाबत वडिलांकडे तक्रार केली. निर्विघ्न हा शाळेत खूप मस्ती करतो, तसेच वर्गात खूप बडबडतो, अशी तक्रार शिक्षकांनी केली. या तक्रारीनंतर निर्विघ्नच्या आईवडिलांनी निर्विघ्नला खडसावले आणि शाळेतून पुन्हा घरी जाण्यासाठी निघाले, याच वेळी शाळेच्या बाहेर पडल्यानंतर वडील कामावर गेले आणि आई घराकडे निघाली. यावेळी निर्विघ्नने मी इथे थांबतो, तुम्ही घरी जा, असे सांगितल्यानंतर निर्विघ्न हा पुन्हा घरी गेलाच नाही. मुलगा घरी आलाच नाही हे पाहून आईवडिलांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र, मुलगा निर्विघ्न सापडला नाही. त्यामुळे अपहरणचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version