पाली महिला गटातील कबड्डी स्पर्धेत किहीम विजयी

| पाली/गोमाशी | वार्ताहर |

शिवकन्या स्पोटर्स क्लब पाली यांच्या वतीने महिला गटातील जिल्हा स्तरीय भव्य कबड्डी स्पर्धाचे आयोजन बल्लाळेश्‍वर नगर पाली येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत जिल्ह्यातील नामवंत 16 महिला संघाने आपला प्रवेश नोंदविला होता. सुधागड तालुक्यात प्रथमच महिलांच्या कबड्डी स्पर्धाचे आयोजन केल्यामुळे या स्पर्धेसाठी क्रीडाप्रेमीनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

या स्पर्धेतील अंतिम लढत किहीम विरुद्ध मांडवा या संघात झाली .या लढतीत किहीम हा संघ अंतिम विजयी ठरला . या संघास रोख रक्कम 7 हजार रु व आकर्षक चषक तर उपविजेता मांडवा या संघास रोख रक्कम 5 हजार रु व आकर्षक चषक देण्यात आले. या स्पर्धेतील तृतीय क्रमांकांचा मानकरी पाली तर चतुर्थ क्रमांकाचा मानकरी दिघेवाडी या दोन्ही संघास प्रत्येकी 3 हजार रु व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू धनश्री बेंद्रे , उत्कृष्ट चढाई श्रावणी पाटील , तर उत्कृष्ट पक्कड आर्या पालांडे या खेळाडूंना संयोजक सचिन पालांडे आणि शिवकन्या स्पोर्ट्स क्लबच्या वतीने आकर्षक बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले.

Exit mobile version