| जळगाव | वृत्तसंस्था |
जळगावमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. जुन्या वादातून सात ते आठ जणांच्या टोळक्याने हॉटेलमध्ये जेवत असलेल्या तरुणावर वार केले. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून या घटनेने जळगाव पुन्हा एकदा हादरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील कालिका माता मंदिर परिसरातील हॉटेल भानू येथे रात्रीच्या वेळी किशोर सोनवणे हा तरुण काही मित्रांच्या समवेत जेवण करत असताना सात ते आठ तरुण हातात काठ्या घेऊन हॉटेलमध्ये शिरले. त्यानंतर टोळक्याने किशोर सोनवणेवर हल्ला केला. यामुळे किशोर सोनवणे यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेतील आरोपी विरोधात शहरातील शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चार जणांना अटक करण्यात आली आहे. जुन्या वादातून ही घटना घडली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.