चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या

। तळा । वार्ताहर।

तळा तालुक्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे. चारित्र्याच्या संशयावरून पतीने आपल्या पत्नीवर चाकूने वार करून दगडाने ठेचून हत्या केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

तळा तालुक्यातील दाहिवली बौद्धवाडी येथील आरोपी सिताराम धोंडू शिर्के (55) याने आपली पत्नी मालती सीताराम शिर्के (50) हिची हत्या केली आहे. चारित्र्याच्या संशयावरून रविवारी (दि. 23) सायंकाळी 4.30 च्या सुमारास आरोपीने पत्नीच्या पोटावर चाकूने सपासप वार करून नंतर दगडाने डोक्यावर ठेचून तिची हत्या केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे.

या प्रकरणाचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मा.सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गवई करीत आहे.

Exit mobile version