बोर्ली स्थानकावर खड्ड्यांचे साम्राज्य

। कोर्लई । वार्ताहर ।

गेल्या चार पाच दिवसापासून पडत असलेल्या जोरदार पावसामुळे बोर्ली स्थानकावर खड्ड्यांचे साम्राज्य असून प्रवासी व वाहनचालकांना त्रास सहन करावा लागतो आहे. बोर्ली नाक्यावर रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचल्याने रस्त्याची दुरवस्था झालेली असून वाहनचालकांना वाहने चालवताना कसरत करावी लागते आहे. यामुळे वेळप्रसंगी अपघाताची शक्यता लक्षात घेऊन शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे .पावसामुळे तालुक्यातील विहूर, नांदगाव, मजगांव, उसरोली, काशिद,बोर्ली,कोर्लई भागात रस्त्यावर दरवर्षीप्रमाणे अनेक ठिकाणी पाणी साचल्याने रस्त्याची पुन्हा जैसे थे अवस्था झाली आहे. पावसामुळे बोर्ली स्थानकावरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून या खड्ड्यामुळे टू-व्हीलर वाहनाला वेळप्रसंगी अपघाताची शक्यता लक्षात घेऊन शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने यात लक्ष पुरवून उपाययोजना करण्याची मागणी वाहनचालक व ग्रामस्थांतून होत आहे.

Exit mobile version