युवासेना अधिकारीपदी किरण पिंपळे

| पाली | वार्ताहर |

रायगड जिल्ह्यातील युवासेना पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या नुकत्याच जाहीर करण्यात आल्या. त्यामध्ये सुधागड तालुक्यातील अडुळसे येथील युवा कार्यकर्ते किरण पिंपळे यांची युवासेनेच्या सुधागड तालुका युवा अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली.

पिंपळे यांनी याअगोदर उपअधिकारी म्हणून तालुक्यात युवा सेनेसह शिवसेनेचे पक्ष संघटन मजबूत करण्याचे काम उत्कृष्ट पद्धतीने केल्याने त्यांच्या कार्यपद्धतीवर विश्‍वास ठेवून पक्षश्रेष्ठींनी त्यांची बढती तालुका युवा अधिकारीपदी केल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या निवडीनंतर तालुक्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा.

Exit mobile version