कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण
| रत्नागिरी | प्रतिनिधी |
रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात राणे विरुद्ध राऊत असा सामना होत आहे. कोकणात कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. कोकणात मंगळवारी मतदान होत असतानाच उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉट रिचेबल असल्याचे समोर आले आहे. निवडणुकीच्या तोंडावर किरण सामंत नॉट रिचेबल असल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
सकाळपासून किरण सामंत नॉट रिचेबल असल्याने शिवसेनेचे कार्यकर्ते संभ्रमावस्थेत आहेत. सकाळपासून किरण सामंत यांचा फोन नॉटरीचेबल आहेत. कार्यकर्ते किरण सामंत यांच्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न अयशस्वी होत आहे. किरण सामंत हे कार्यकर्त्यांच्या संपर्कात नसल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, एखादा व्यक्ती नॉट रिचेबल आहे म्हणजे माणूस वेगळेच काहीतरी करतो, ही भावना निर्माण करणे हे पण लोकशाहीमध्ये एक आक्षेप घेतल्यासारखे आहे. सगळं काही व्यवस्थित सुरू आहे, अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली आहे.