| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह अवस्थेतील एक कथित व्हिडिओ काल समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. विरोधकांकडून त्यांच्यासह भाजपवर तुफान हल्ला चढवला. या घटनेनंतर पहिल्यांदाच ते सोमवारी (दि.24) अलिबागमध्ये आले. एरव्ही मोठा फौजफाटा घेऊनच अलिबागमध्ये येणारे माजी खा. किरिट सोमय्या पहिल्यांदाच गुपचूप अलिबागमध्ये आल्याचे दिसून आले. या घटनेवरुन त्यांनी केलेल्या अश्लिल कृत्यामुळे चर्चेत आल्यानंतर तोंड लपविण्याची वेळ त्यांच्यावर आली असल्याचे या घटनेवरुन दिसून आले.
गेले कित्येक महिन्यांपासून किरिट सोमय्या अलिबागला सातत्याने येत आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नीने खरेदी केलेल्या जमिन गैरव्यवहाराबाबत ते पाठपुरावा करीत आहेत. प्रत्येकवेळी कोर्लईला जाताना अथवा अधिकाऱ्यांना भेटताना त्यांच्या सोबत कार्यकर्त्यांची मोठी गर्दी असते.
यावेळी मात्र कार्यर्त्यांना तोंड दाखविण्याची हिम्मत नसल्यानेच त्यांनी गुपचूप येण्याचा निर्णय घेतला असावा, अशा चर्चा अधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर सुरु असल्याचे ऐकायला मिळाले. सोमय्यांनी अलिबागला येण्यामागचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र त्यांनी सोमवारी रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन. बास्टेवाड यांची भेट घेतली.