कोएसो माणकुले शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा ऋणानुबंध सोहळा

| रायगड | प्रतिनिधी |

कोएसोच्या माणकुले शाळेच्या माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींचा ऋणानुबंध सोहळा माणकुले येथे नुकताच पार पडला. सुमारे तीस वर्षांनी सर्व एकत्र आले होते. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

माजी विद्यार्थिनींनी उपस्थित सर्व मान्यवरांसह माजी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देत स्वागत केले. त्यानंतर श्रीरामाच्या मंदिर लोकार्पण सोहोळ्याचे औचित्य साधून सर्व मान्यवरांना अयोध्येतील श्रीरामाच्या मंदिराची प्रतिकृती भेट देण्यात आली. यावेळी अनेक माजी विद्यार्थ्यांनी आपापल्या मनोगतात जुन्या आठवणींना उजाळा दिला. सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दहाविच्या विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्यांचे वाटप करण्यात आले. तसेत शाळेला स्पीकर भेट देण्यात आला. त्याचबरोबर शाळेच्या आवारात माजी विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण केल्यानंतर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

माजी विद्यार्थ्यांपैकी संतोष म्हात्रे, निषाद पाटील, गिरीश पाटील, दिनेश पाटील, समाधान, अस्मिता पाटील, रेश्मा म्हात्रे, सुषमा ठाकुर, मिलीगीता अंबाडे, प्रगती पाटील, जयंती पाटील, ज्योत्स्ना म्हात्रे, सीमा पाटील, सोनाली पाटील, अमिता गावंड, अक्षय गावंड, गजानन म्हात्रे, विजय पाटील, नितीन म्हात्रे, संतोष धुमाळ, अमोल धुमाळ, नंदकिशोर पाटील, नीलम पाटील, सचिन पाटील उत्कर्ष पाटील, संतोष पाटील, जितेंद्र म्हात्रे, अरुण म्हात्रे, विदुर पाटील, समाधान पाटील, संजय पाटील, शैलेश पाटील, उमेश पाटील, राजन म्हात्रे यावेळी उपस्थित होते. याशिवाय प्राचार्य लोकरे, पी.के पाटील, टी.व्ही पाटील, जे.एस पाटील, नाले, प्रधान, राऊळ, एच.पी. पाटील, पांचाळ, श्रीकांत, तेलंगे, शिर्के, अपर्णा आणि उज्ज्वला या शिक्षकांसह गोरखनाथ पाटील हे सुद्धा याप्रसंगी उपस्थित होते.

Exit mobile version