। मुंबई । विशेष प्रतिनिधी ।
कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे कोकणातील सभासद साहित्यिकांना विविध वाङ्मय पुरस्कार दिले जात असून, जानेवारी 2022 मध्ये दिल्या जाणार्या पुरस्कारांसाठी लेखकांकडून त्यांच्या साहित्याची पुस्तके पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
परिषदेतर्फे देण्यात येणारे सर्व पुरस्कार हे कोमसापच्या सर्व सभासद साहित्यिकांसाठी मर्यादित असून, यामध्ये गोवा, कारवार, बेळगाव या प्रदेशातील साहित्यिकांचाही विचार करण्यात येणार असल्याचे परिषदेतर्फे सांगण्यात आले आहे.
यामध्ये विविध साहित्यप्रकारांवर आधारित पुरस्कार असून, विशेष पुरस्कारांचाही समावेश आहे. या पुरस्कारासाठी साहित्यिकांनी आपल्या पुस्तकाच्या दोन प्रति 20 डिसें.2021 पूर्वी समितीचे निमंत्रक प्रा.अशोक ठाकूर द्वारा सोनोपंत दांडेकर महाविद्यालय, पालघर, पिन – 401404 यांचेकडे जमा करण्याची सूचना करण्यात आली आहे.