कोळवट ग्रामस्थांचा राष्ट्रवादीत प्रवेश

। म्हसळा । वार्ताहर ।
म्हसळा तालुक्यातील कोळवट ग्रामस्थांनी शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला. गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर कोलाड, सुतारवाडी येथील गीता बागेत खासदार सुनिल तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे यांच्या उपस्थितीत कोळवट येथील स्थानिक व मुंबई निवासी ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेचे कृषी सभापती बबन मनवे, म्हसळा पंचायत समितीचे सदस्य मधुकर गायकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

म्हसळा तालुक्यात होत असलेल्या विकासकामांवर प्रभावित होऊन अनेक ग्रामस्थांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इनकमिंगला जोरदार सुरुवात केली आहे. दोन दिवसांपूर्वी घोणसे निवाचीवाडी येथील संपुर्ण ग्रामस्थांनी आ.अनिकेत तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.कोळवट, घोणसे गावांच्या विकासाबरोबरच पक्ष प्रवेशकर्त्या ग्रामस्थांना पक्षात सन्मानाने सामावून घेण्यात येईल, असा शब्द खा.सुनिल तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे, आ.अनिकेत तटकरे यांनी कोळवट ग्रामस्थांना दिला आहे.

Exit mobile version