सोनारसिद्ध चषकावर कोळीवाडा पेण संघाची बाजी

। धाटाव । वार्ताहर ।
रोहा तालुक्यातील क्रीड़ा क्षेत्रात नावाजलेल्या धाटाव येथील सोनारसिद्ध चषक भव्य क्रिकेट स्पर्धेमधे सायंकाळी उशिरा पर्यत झालेल्या सामन्यात अखेर कोळीवाडा पेण या संघाने दमदार बाजी मारली आणि संपूर्ण सामन्यात हा संघ अंतिम विजेता ठरला. अंतिम फेरीत क्लेरीएंट संघाला पराजित करून कोळीवाडा पेण संघ तब्बल 1 लाख 10 हजार व आकर्षक चषकाचा मानकरी ठरत अव्वल ठरला.
धाटावचे माजी सरपंच विनोद पाशिलकर यांच्या 54 व्या वाढदिवसाचे औचित्त साधुन आयोजित केलेल्या टेनिस क्रिकेट स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाला विधान परिषदेचे आ.अनिकेत तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस विजयराव मोरे, जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर पाटील, तालुकाध्यक्ष विनोद पाशिलकर, प्रदीप देशमुख, लीलाधर मोरे, जयवंत मुंढे, अनिल भगत, रामा म्हात्रे, नरेश पाटील, वसंत भोईर, अमित मोहिते, सतीश भगत, मुकेश भोकटे यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सतत चार दिवस सुरू असलेल्या या स्पर्धेत एकूण 32 संघानी सहभाग दर्शविला होता. या स्पर्धेत क्लेरिएंट संघ उपविजेता तर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पोस्टाचीवाडी व चतुर्थ क्रमांक वाघेश्‍वर रोठखुर्द संघाला घोषित करण्यात आले. या संपूर्ण स्पर्धेत तेजस माळी याला मालिकावीर म्हणून स्पोर्ट सायकल देऊन गौरविण्यात आले. तर उत्कृष्ट फलंदाज कोळीवाडा पेण संघाचा देवांश तांडेल याला कुलर व उत्कृष्ट गोलंदाज पोस्टची वाडी संघाच्या अनिकेत देशमाने याला सुद्धा कुलर देऊन गौरवण्यात आले. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक क्लेरीएंट संघाच्या अजय मोरेला सन्मानित करण्यात आले.
सतत चार दिवस सुरु असलेल्या सामन्यांचे यूट्यूबच्या माध्यमातून प्रक्षेपण करण्यात आले होते. सामन्यांचे उत्तम समालोचन यासीन मर्चंट, हर्षल मुंडे, विशाल म्हात्रे, समीर सोमने, उमेश साळुंखे यांनी केले. नयन रटाटे, सूर्यकांत मोरे, महेंद्र शेळके यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली झालेल्या या स्पर्धा यशस्वी करण्याकरिता सतीश जाधव, महेंद्र रटाटे, उमेश खैरे, भास्कर रटाटे, संतोष रटाटे, नितिन रटाटे, चंद्रकांत रटाटे, रोहिदास भोकटे, केतन पवार, नामदेव शेळके यांसह सहकार्यानि मेहनत घेतली.

Exit mobile version