मयूर शेळके यांना कोकण शौर्य पुरस्कार

नेरळ | प्रतिनिधी |
मध्यरेल्वेच्या वांगणी रेल्वे स्थानकात एका लहान मुलाचा जीव वाचवणार्‍या देवदूत मयूर शेळके यांना कोकण शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे . कोकण विभाग पत्रकार संघाचा 9वा वर्धापन दिन सोहळा 28जुलै 2021 रोजी मुरबाड तालुक्यातील संगम येथील देशमुख मराठा सभागृहात आयोजित केला आहे.या सोहळ्यास केंद्रीय राज्यमंत्री.कपिल पाटील,खा.राजेंद्र गावित,आ.किसन कथोरे ,आ.राजू पाटील यांच्या उपस्थित नऊ नवरत्न यांचा सत्कार केला जाणार आहे. मयूर शेळके यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अभिनंदन मयूर शेळके यांच्या घरी जाऊन कोकण पत्रकार संघाचे रायगड जिल्हा अध्यक्ष दीपक बोराडे यांनी केले.

Exit mobile version